
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९६ वा दिवस

मन जाणिवेच्या पलीकडे जाऊ शकते, आपले मन जणू एखाद्या तलावासारखे आहे, आणि आपण करीत असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू त्या तलावात उठणारा एकेक तरंग, एकेक लाट आहे. ज्याप्रमाणे तलावात तरंग किंवा लाटा उसळतात, कोसळतात आणि विरून नाहीशा होतात, त्याचप्रमाणे चित्तातही विचारांचे तरंग वा लाटा सतत उठत असतात आणि मग विरून जात असतात; पण त्या अजीबातच नाहीशा होत नसतात. चित्तात उठणारे ते तरंग वा त्या लाटा क्रमशः अधिकाधिक सूक्ष्म होत जातात, परंतु सूक्ष्मस्वरूपात विद्यमानच राहतात, आणि प्रयोजन पडताच केव्हाही फिरून उदित होण्यास तत्पर असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २६ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६
★ जेष्ठा गौरी आवाहन
★ विश्वकर्मा जयंती
★ १८८५ समाजसुधारक, लेखक, पत्रकार, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा जन्मदिन.
★ १९५१ समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्मदिन.
★ १९४८ मराठवाडा मुक्ती दिन.
★ राष्ट्रीय श्रम दिन.

