
लासलगाव ( प्रतिनिधी) ता. १ येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा.महेश होळकर यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

