
*सिन्नर येथे फुले प्रेमींचा स्नेहमेळावा *सिन्नर सार्वजनिक वाचनालय सिन्नर वेळ ठीक सकाळी ११ वाजता दिनांक गुरुवार २ जुलै २०२६ *मा. खा .डॉ.अमोल कोल्हे करणार “सावित्रीबाई जोतीराव फुले “मालिकेबाबत फुले प्रेमींशी हितगुज व चर्चा* फुले दाम्पत्यांच्या जीवन संघर्षावर चितारलेली “सावित्रीबाई जोतीराव फुले ” या लोक मालिकेचा व्दितीय भाग काल बुधवार दि. २४ /६ /२०२६ रोजी ‘ मराठी वारसा ‘ या युट्युब चॅनेलवर नुकताच प्रसारित केला गेला . यास राज्य, देश व विदेशातीलफुले प्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळून जगदंब किएशन व या मालिकेचे निर्माता डॉ.अमोल कोल्हे यांचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे . समाज माध्यमांवर त्यांचेवर अभिनंदनाचा पाऊस पडत आहे . ही मालिका शेवटच्या घटकापर्यंत पोहचावी यासाठी फुले प्रेमींशी हितगुज व चर्चा करून मालिकेविषयी शंका-कुशंका, सूचना, नवीन विषय,’ मायबाप प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आपणांस विदित आहेच की,स्टार प्रवाह या टीव्ही चॅनेलने फुले चरित्रावरील मालिका १४ जून रोजी बंद केल्याने फुले लाखो प्रेमी नाराज झालेले होते. याच लोकभावनेचा आदर करत प्रेक्षकांना याची वस्तुस्थिती माहिती व्हावी यासाठी फुले प्रेमी व प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांचेर प्रत्यक्ष संवाद साधणार आहे ” सावित्रीबाई जोतीराव फुले ” या मालिकेला लाभत असलेला उदंड प्रतिसाद हेच या कलावंतांचं खर बळ ठरणारं आहे . लाखो फुले प्रेमी या मालिकेला सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार आहे . त्यासाठी अभिनेता व निर्माता डॉ. अमोल कोल्हे दि.२ जुलै रोजी आपल्या भेटीस येत आहे. या भेटीच्या पहिल्या चरणात ते येत्या २ जुलै रोजी सिन्नरला भेट देणार आहे.त्यांचे सहृदय अभिनंदन व शुभेच्छा देत पुढील वाटचालीस तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे . आपण फुले प्रेमांना भेटून, त्यांचेशी संवाद साधून,विचारविनिमय करून मालिकेचे पुढील भाग सर्वोत्तम घडावेत व फुले विचार देश – विदेश पातळीवर जावेत या साठिचा सावित्री शक्ती पीठाचा हा अल्पसा प्रयत्न आहे . या संवाद व सहविचार बैठकीला सिन्नरकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती .वेळ :- सकाळी :११ वा.स्थळ:- सिन्नर सार्वजनिक वाचनालय सिन्नर

