
मांडवड (प्रतिनिधी):-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक यांच्या वतीने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल,नाशिक येथे पार पडलेल्या 17 वर्षातील मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये नांदगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच स्व.शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवडच्या मुलींच्या संघाच्या रुपाने नांदगाव तालुक्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळाला.

विजयी संघातील सर्व खेळाडू पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे संघातील सर्व खेळाडू,प्रशिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यात

वैजयंती संपत गांगुर्डे,राणी गणेश गुजर, सिद्धी सतीश गांगुर्डे,ऋतुजा कमलाकर आहेर, स्वेता संतोष गांगुर्डे,ऋतिका सचिन आहेर, अक्षदा आनंद गांगुर्डे ,सायली संजय आहेर, नंदिनी संदीप पिंगळे,वैष्णवी आबासाहेब आहेर, पुनम संदीप गांगुर्डे,गौरी संजय उगले या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात अवलस्थान मिळवून दिले या खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप आहेर,विशाल आहेर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे सर्व पदाधिकारी,नांदगाव तालुका संचालक इंजि.अमितभाऊ बोरसे पाटील,प्रशांत आहेर,मुख्याध्यापक बी.आर. महाले,राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त श्रीमती शैलजा जैन,आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आकाश शिंदे, ऑलम्पिक मेडल प्राप्त दत्तू भोकनळ,शरद पाटील, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक मोहन गायकवाड,बंटी बागुल, असलम पठाण,सागर आहेर, यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्व सभासद, शालेय समितीचे सदस्य, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी क्रीडाशिक्षक संघटना सर्व पालक व ग्रामस्थ मांडवड यांच्या वतीने दोन ढोलताश्यांच्या गजरात,गुलाल फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढून सर्व विजयी खेळाडूं व प्रशिक्षकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
मांडवड सारख्या छोट्याशा खेड्यातील मुलींनी जिद्द चिकाटी आणि परिश्रम करून आज संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात आपली वेगळीच ओळख तयार केली आहे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आयोजित जिल्हास्तरीय मविप्र कर्मवीर चषकाचे पहिल्यांदाच भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेतही स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड संघाने मविप्र कर्मवीर चषकावर आपले नाव कोरले आहे त्यामुळे सर्व पालक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण असून पालकांचाही खेळाडूंना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रतिक्रिया:1

संस्थेच्या वतीने प्रथमच भरविलेल्या जिल्हास्तरीय कर्मवीर चषक स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्या नंतर जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत नांदगावच्या इतिहासात प्रथमच मुलींच्या संघाने जिल्हात प्रथम क्रमांक मिळाल्याने संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे, संस्थेचे सरचिटणीस ऍड नितिन ठाकरे व संचालक मंडळाकडे पाठपुरावा करून मुलींना कबड्डी साठी मॅट उपलब्ध करून देणार.
इंजि. अमितभाऊ बोरसे-पाटील
(मविप्र नांदगाव तालुका संचालक)
प्रतिक्रिया: 2

“मांडवडच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरावर अव्वल क्रमांक पटकावून संपूर्ण गावाचा गौरव वाढवला आहे. खेळाडूंनी शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर हे यश मिळवले. या यशाचे श्रेय सर्व खेळाडू, पालक आणि ग्रामस्थांच्या पाठिंब्याला जाते. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही संघ आणखी दमदार कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
श्री. संदीप आहेर
क्रीडा शिक्षक,मांडवड

