
नांदगाव ( प्रतिनिधी )आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नाशिक जिल्हा नवनिर्वाचित पदाधिकारी यांची ओळख परिचय बैठक नांदगाव येथे हॉटेल आश्रय गंगाधरी नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी महामानवांना पुष्प वाहून वंदन करून या मिटींगला सुरुवात करण्यात आली या बैठकीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अँड सुमित भाऊ बोराळे तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर नेहा ताई रवींद्र जाधव तसेच ॲड मोरे मनमाड सरचिटणीस सागर भाऊ सागळे येवला आदी मान्यवर उपस्थिती होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गांगुर्डे जिल्हा सरचिटणीस यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सोहळा संपन्न होऊन अँड मोरे तसेच नेहा ताई जाधव यांचे मनोगत झाले तसेच जिल्हा अध्यक्ष सुमित भाऊ बोराळे यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर किरण भाऊ गवळे मनोज निकम कैलास लोखंडे आदींचा सत्कार करण्यात आला
सामाजिक नेते कपिल भाऊ तेलोरे त्यांनीही जिल्हा अध्यक्ष यांची भेट घेऊन सत्कार केला या ओळख परिचय बैठकीच्या आयोजन राजाभाऊ गांगुर्डे जिल्हा सरचिटणीस यांनी केले कार्यक्रमाचे आभार सागर भाऊ साबळे यांनी मानले व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला

