
मनमाड ( प्रतिनिधी ) मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे जेष्ठ वाचक सदस्य स्वर्गीय विलासकाका नथुजी काळे यांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने काळे परिवार तर्फे श्रीमती अलका विलास काळे,ऍड अविनाश विलास काळे, अरविंद विलास काळे सौ. अश्विनी अमित मोरे यांनी स्वर्गीय विलास नथुजी काळे यांच्या स्मृती पुस्तकं रूपाने सदैव जिवंत असाव्यात म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयास सुमारे 21000/-रुपये किंमती ची दुर्मिळ लेखकांची आरोग्य विषयक, धार्मिक, चरित्रग्रंथ , देशभक्ती विषयक, ऐतिहासिक,इतिहास विषयक,सामाजिक,राजकीय,कादंबरी, कथा संग्रह, मानस शास्त्र विषयक अशी सुमारे 50 पुस्तकं ग्रंथ भेट मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांच्या कडे सुपूर्द केली

ग्रंथ भेट स्वरूपात श्रद्धांजली या अभिनव उपक्रमा करत काळे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे प्रसंगी प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. संजय राकिबे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, अमितराव मोरे,सौ. प्रीती अविनाश काळे,अभिषेक काळे, सप्तेश काळे विवान अविनाश काळे आदी मान्यवरांन सह काळे परिवाराचे नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे यांनी ग्रंथ भेट दिल्या बद्दल काळे परिवाराचे आभार व ऋण व्यक्त केले कार्यक्रम चे सूत्रसंचालन सौ. अनिता विक्रम सप्रे यांनी केले

