
मनमाड ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७६ व्या जन्मदिनाच्या निमित्त येवला भाजपा तर्फे आयोजित रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद देत १६४ रक्तदात्या कडून विक्रमी रक्तदान हिंदुस्थान चे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७६ व्या जन्मदिना निमित्ताने भाजपा तर्फे देशभरात सेवा संकल्प अभियान सुरु आहे त्याच अंतर्गत येवला भाजपा तर्फे भाजपा चे नाशिक उत्तर जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शन नें सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबीर व आशीर्वाद चा दिवा वाटप या कार्यक्रमाचे दिनांक १७ सप्टेंबर रोजी प. पूज्य.डॉ. हेडगेवार सभागृह येवला मर्चन्ट बँक येथे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे संघचालक दिनेशजी मुंडदा यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी नाशिक जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे,प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकरजी झळके सर, येवला मर्चंट को. ऑ. बँकेचे माजी चेअरमन विकिरणसिंह परदेशी,भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व आशीर्वादचा दिवा उपक्रम चे जिल्हा संयोजक नितीनजी पांडे, भाजपा ओबीसी आघाडी चे उत्तर महाराष्ट्र संयोजक सचिनजी दराडे, येवला विधानसभा प्रमुख अमृताताई पवार,भारतीय मजदूर संघा चे श्रावणदादा जावळे,भाजपा पाटोदा मंडल अध्यक्ष संतोषजी काटे मुकुंदनाना गंगापूरकर, देविदास भांबरे, विश्व हिंदू परिषदेचे ॲड.शैलेशी भावसार, जनकल्याण समितीचे नारायण मामा शिंदे, शैलेश देसाई साहेब, सुहासजी घाटकर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन भाऊ आहेर, ऐतिहासिक जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष जी पाटोळे, दत्तात्रय महाले सर, अतुल काथवटे, रा.स्व.संघाचे जिल्हा सेवाविभाग सहप्रमुख कृष्णा वडे, भाजपा येवला ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राहुल लोणारी, दीपक भदाने,
येवला शहराच्या उपनगराध्यक्षा सौ. पुष्पा गायकवाड, भाजपा नगरसेविका सौ.लक्ष्मी साबळे सौ.छाया क्षीरसागर, श्रीमती अनुराधा भायभंंग, माजी नगराध्यक्ष बंडू पैलवान क्षीरसागर, युवराज पाटोळे, संतोष नागपुरे, गणेश पाटोळे, सचिन साबळे, श्रीकांत खंदारे, मयुर मेघराज, धीरजसिंह परदेशी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजक आनंद शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत सेवा संकल्प अभियान ची सविस्तर माहिती दिली तर जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी आशीर्वाद चा दिवा या अभिनव उपक्रमाची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभणे साठी दिवा लावावा असे आवाहन केले सुभाष पाटोळे, दत्तात्रय महाले सर यांनी पण मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले या रक्तदान शिबीरा मध्ये येवला शहर व ग्रामीण भागातील युवकांनी मोठा उस्फुर्त प्रतिसाद देत १६४ रक्तदात्यानी ऐच्छीक रक्तदान केले यावेळी आनंद शिंदे यांच्या सहकार्य नें प्रत्येक रक्तदात्या ला नाव व फोटो असलेले छापील प्रमाणपत्र व आशीर्वाद चा एक दिवा (पणती )मान्यवरां च्या हस्ते देऊन त्याच्या गौरव करण्यात आला या शिबिरात जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक यांनी रक्त संकलन केले.

व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते, भाजपा युवा नेते
सर्वेश मेहेंदळे यांनी या रक्तदान शिबीरास विशेष भेट दिली त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते शी विविध विषया वर चर्चा करीत संवाद साधला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी येवला भाजपा शहर महामंत्री मच्छिंद्र पवार, राधेश्याम परदेशी व ज्येष्ठ मार्गदर्शक आबासाहेब सुखासे, निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, विनायक वाघ, अखिल शहा, संकेत जाधव, आकाश राजपूत, परेश आढाव, बाळासाहेब शिंदे, महेश वडे, कृष्णा कव्हात, विजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शहरातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली कार्यक्रमाचे संयोजन भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांनी केले.


