
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९८ वा दिवस

सुखदुःखेच्छालाभादित्यक्ते काले प्रतीक्ष्यमाणे क्षणार्धमपि व्यर्थ न नेयम्। (नारदभक्तिसूत्र ७७)
वेळ-काळ कोणासाठी कदापि थांबत नाही. सुख-दुःख किंवा यश-अपयश या गोष्टी निसर्गाच्या नियमानुसार येत-जात राहतील. पण, ‘चांगली वेळ येईल तेव्हाच मी काम करेन’ असा विचार करून हात पाय गाळून बसणे अत्यंत चुकीचे आहे. मनुष्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून आपले कर्म सतत करत राहिले पाहिजे. भक्त होण्यासाठी आपण प्रथम स्वर्ग वगैरेच्या समस्त वासनांना तिलांजली द्यावी. असला स्वर्ग म्हणजे या आपल्या स्थानासारखाच या पृथ्वीसारखाच असणार तिच्या परीस अमळ बरा, इतकेच. आपली जी सारी स्वर्गाला जाण्याची वासना आहे ती म्हणजे निव्वळ भोग सुखासाठीच कामना होय, तिचा त्याग करायला हवा. भक्ताचे भगवंतावरील प्रेम हे संपूर्णपणे शुद्ध आणि निःस्वार्थ असेच असले पाहिजे त्यात स्वतःसाठी ईहलोकाच्या वा परलोकीच्या कशाचीच आकांक्षा मिसळलेली नको.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २८ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२६
★ दुर्गाष्टमी (राधाष्टमी)
★ जेष्ठा गौरी विसर्जन
★ महर्षी दघींची जयंती
★ १९३६ संगीतशास्त्रकार, हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा स्मृतिदिन.
★ १९६३ जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

