
नाशिक ( प्रतिनिधी ) विडंबन म्हणजे कवितेतून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात चाललेल्या अनागोंदी कारभाराचा अंजन घालून केलेले सुधारणा वादी पाऊल आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विडंबनकार संजय आहेर यांनी केले. विजयनगर येथील शहा गार्डन इस्टेट येथे विघ्नहर्ता गणेश मंडळात संजय आहेर यांचा विडंबन कविता कार्यक्रम आयोजित केला होता, त्या प्रसंगी ते बोलत होते, बाळासाहेब गिरी यांनी आई, मुलगी वडील यांच्या कविता सादर केल्या, तर संजय आहेर यांनी स्ट्रॉबेरी, आजकालची सामाजिक परिस्थिती यावर अतिशय सुंदर विडंबन कार्य केले,

अतिथींचे स्वागत स्वप्नील घोरपडे, व स्वप्नील आव्हाड यांनी केले, सुमारे दोन तास अतिशय सुंदर कार्यक्रम झाला, कार्यक्रमास जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष दिलीप चव्हाण, कवी रवींद्र आहेर, व सोसायटी मधील अनेक मान्यवर उपस्थित होते, आयोजन सूत्रसंचलन प्रशांत कापसे यांनी केले.


