
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३९९ वा दिवस

निश्कलंक चारित्र्य हाच व्यक्तिमत्व विकासाचा मूलभूत पाया आहे. चारित्र्यावर आधारित व्यक्तिमत्व हेच खरे व्यक्तिमत्व होय. अशा महान व्यक्तीमत्वांचा जगाला कधीच विसर पडत नाही. त्यांची नावे थेट लोकांच्या हृदयामधे चिरकालासाठी अंकित होऊन राहतात.अशा व्यक्तिंची संख्या जरी कमी असली तरी तेच जगाचे नेतृत्व करण्यास समर्थ असतात. ते समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम करतात.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २९ शके १९४८
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २० सप्टेंबर २०२६
★ १८९८ “सकाळ” वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष, भारतीय पत्रकारीतेचे पितामह, पद्मविभूषण नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर यांचा जन्मदिन.
★ १९३३ भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, ४५० ग्रंथाच्या लेखिका, थिऑसाॅफिस्ट, होमरुल लीगच्या संस्थापिका अॅनी बेझंट यांचा स्मृतिदिन.
★ १९६५ भारत पाकिस्तान युध्दात लाहोर आघाडीवर लढतांना शहिद झालेले, दाभाडी ता. मालेगाव (नाशिक) चे भूमिपुत्र, भारतीय जवान हुतात्मा दगा लोटन निकम यांचा स्मृतिदिन.

