

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३१९ वा दिवस
विस्तार पावणे हेच जीवन, तर संकोच पावणे हाच मृत्यू. विस्तार म्हणजेच प्रेम, विचार आणि कृतीमध्ये 'सर्वसमावेशक' असणे होय; आणि संकोच म्हणजे संकुचित वृत्ती, स्वार्थ व इतरांप्रती द्वेष बाळगणे. प्रेम हेच जीवन, घृणा म्हणजेच मृत्यू. माझी अगदी पक्की खात्री झाली आहे की कुणीही व्यक्ती वा कोणताही देश इतर सर्वांपासून स्वतःला वेगळे काढून जिवंत राहणे शक्य नाही; आणि मोठेपणाच्या, पावित्र्याच्या वा व्यवहारचातुर्याच्या खोट्या कल्पनांनी जेव्हा जेव्हा असा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा त्याचे घातक परिणाम अलग होणाऱ्यांना भोगावे लागले आहे. ज्या ज्या गोष्टींनी आपण सार्वभौमिक तत्त्वाशी एक होतो त्या त्या गोष्टी सद्गुण होत आणि ज्या ज्या गोष्टींनी आपण त्या तत्त्वापासून वेगळे होतो त्या त्या गोष्टी पाप होत. तुम्ही त्या 'अनंता'चा एक अंश आहात. हेच तुमचे वास्तविक स्वरूप आहे. म्हणून तुम्ही तुमच्या बांधवांचे संरक्षक आहात.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ ११ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरूवार दि. २ जुलै २०२६
★ १९२३ स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेते, दैनिक लोकमतचे संस्थापक जवाहरलाल अमोलकचंद दर्डा यांचा जन्मदिन.
★ १९५० समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, मुंबईचे माजी महापौर युसूफ मेहेर अली यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

