
नांदगाव (प्रतिनिधी): किसान माध्यमिक विद्यालय, वाखारी येथील मुख्याध्यापक मा. श्री. खंडू खालकर यांनी आपल्या सेवापूर्तीच्या निमित्ताने संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत रुपये ५१,००० इतकी देणगी संस्थेला प्रदान केली.
या देणगीचा धनादेश संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. राहुल मुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विजयजी चोपडा, मा. मनीष चव्हाण, संस्थेचे सहखजिनदार श्री. हेमंत देशपांडे, मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
सेवापूर्तीच्या प्रसंगी संस्थेला दिलेली ही देणगी खालकर सरांच्या संस्थेवरील निष्ठा, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या उदात्त कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, श्री. खंडू खालकर व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

