
सिन्नर:-( प्रतिनिधी ) तालुक्यातील सिद्धी सागर भालेराव हिने नीट -२०२६ मध्ये ७२० पैकी ५२८ गुण मिळवत भारतातील सर्वात जुन्या आणि दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या ग्रॅंट मेडीकल काॅलेज आणि सर जे जे समुह रुग्णालय , मुंबई येथे प्रवेश मिळवला. या वर्षी नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा धीर खचला होता मात्र सिद्धीने महापुरुष – महानायिकांच्या जिवनचरीत्रातून संघर्षाची प्रेरणा घेत पुनर्रपरीक्षा देऊन त्यात यश मिळविले .

या महापुरुष व महानायिकांनी केलेल्या संघर्ष आणि त्यागामुळे आपल्याला मनोधैर्य टिकविता आले व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाली तसेच भविष्यातही रुग्णसेवा देतांना हाच लोकसेवेचा आदर्श कायम रहावा यासाठी तिने महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास अभिवादन करुन पुढील शिक्षणाची सुरुवात केली.
त्यानिमित्त तिला प्रोत्साहन व सदिच्छा देण्यासाठी सर्व संविधान प्रेमी सिन्नरकर उपस्थित होते. यात भिमसंदेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भारतीय बौद्ध महासभा,, बारा बलुतेदार महासंघ, सिन्नर केबल नेटवर्क, आर पी आय शाखा – सिन्नर, उपेक्षित लोकविकास संस्था, महामित्र परीवार, तक्षशिला बहुउद्देशीय संस्था, अशोका बहुद्देशीय संस्था, भारतभुषण सांस्कृतिक कलापथक, पथनाट्य कलामित्र, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिन्नर, एस. जी, पब्लीक स्कूल (प्राथ.), सिन्नर, आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना महामित्र माजी नायब तहसीलदार वायचळे साहेब यांनी केले तर सुत्रसंचलन बाळासाहेब आव्हाड यांनी केले. नगरसेवक अनिलभाऊ सरवार, विजयजी मोरे, बापू चतूर (सर),डॉ. डी. व्ही. रुपवते, विनोद शितोळे, दत्ताभाऊ पगारे, अशोक भालेराव आदींनी मनोगतातून सदिच्छा आणि पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले…

