
सिन्नर ( प्रतिनिधी )२४ सप्टेंबर २०२६ छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक शिवप्रेमींच्या वतीने सिन्नर येथे उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांना व महंत निश्चलपुरी गोसावी महाराज,मोरया गोसावी महाराज यांच्या प्रतिमेस गोसावी परिवार व मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक ६जून १६७४रोजी रायगडावर झाला. त्यानंतर २४ सप्टेंबर १६७४ रोजी महंत निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर हा दिवस दशनाम गोसावी समाजासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्रात, जिल्ह्यात तालुक्यात व प्रत्येक गावात शिवप्रेमीच्या वतीने हा राज्याभिषेक सोहळा दिन मोठ्या आनंदात उत्सवात साजरा केला जातो असे म्हणाले
स्तंभलेखक प्रा प्रभाकर चतुर सर त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना मानली जाते. राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता असे म्हणाले.
याप्रसंगी दत्तात्रय गोसावी यांचा परिवार कडून पताक उभारण्यात आली व विधवत पुजन करून अभिवादन करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थित घनश्याम देशमुख, आर.एन जाधव, आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, मधुकर गोसावी आदींनी द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा व निश्चलपुरी महाराज यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
तसेच यावेळी ढग्या डोंगर संवर्धन समितीचे जुगल लोहिया यांना गोसावी परिवाराकडून वृक्ष वाटप करण्यात आले गोसावी परिवाराने यावेळी सर्व मान्यवरांचे आभार मानून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या द्वितीय शाक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित दत्तात्रय गोसावी, मीराबाई गोसावी, पूजा गोसावी, माधुरी गोसावी, सविता कोठुरकर, भाऊसाहेब सिलावट, मधुकर गोसावी, राजेंद्र देशमुख, सुरेंद्र क्षत्रिय, प्रथम जोशी, प्रकाश माळी, भाऊसाहेब शिलावट, वसंत पगार, लोक कलावंत अंबादास भालेराव, राजेंद्र दिवे, वसंत पगर, अनिल भाटजिरे, दिगंबर पगार,सुनील कुऱ्हे,चंद्रकांत झगडे,मनोज माळी, प्रकाश माळी,सोमनाथ लोहारकर, धनंजय परदेशी, राजेंद्र देशमुख, राजेंद्र सातपुते आदि शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रभाकर चतुर सर यांनी केले. प्रास्ताविक मधुकर गोसावी यांनी केले.व आभार विजय मुठे यांनी मानले.

