
नांदगाव( प्रतिनिधी ) आमच्या ईथे अजून हि थांबा नाही च….?* आमच्या स्थानकाचा अमृत भारत मोहस्तव अंतर्गत वारेमाप खर्च करून विकास साधला खरे पण…या विकासाचा सारांश आज ही अधोरेखित आहे धन्यवाद आमच्या नांदगाव रेल्वे स्थानक हे विकसित केल्या बद्दल पण मग रेल्वे जर आर्थिक निकषावर चालणारी यंत्रणा असेल तर आर्थिक निकषावर मग रेल्वे थांबा हा क्वचित रेल्वे गाडीना च का…? विकसित स्थानकावरील कोट्यवधी रुपये जर या आर्थिक निकषात वसूल करायचे असेल तर यासाठी प्रथम रेल्वे गाड्याना थांबा देणे हे असले पाहिजे… असो हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया आता मूळ मुद्दा म्हणजे आमच्या प्रलंबित रेल्वे थांब्या विषयक मागण्या नांदगाव रेल्वे स्थानकावरुण पुणे -नांदगाव विद्यार्थी असतिल चाकरमानी असतिल सैनिक असतिल आदी साठी सोयीस्कर रेल्वे गाडी होती ती जम्मू तवि झेलम एक्सप्रेस जी नांदगाव रेल्वे स्थानक नियमित थांबत होती व सोयस्कर देखील होती ती को रो ना काळात फक्त नांदगाव स्थानकावरील थांबा रद्द करण्यात आला तो आज पोहत सुरू करण्यात आलेला नाही..का..? नांदगावकराचि जुनी व हक्काची मागणी आहे अमरावती-पुणे एक्स्प्रेस (जुने नाव पुणे-भुसावळ)एक्सप्रेस जी गाडी आज ही आप साठी सुपरफास्ट एक्स्प्रेस काढण्यासाठी अधिकृत नाही पण नियमित लुप लाईन पिंपरखेड थांबते हे पूर्वी पण असेच होत होते आज ही तसेच आहे विषय मात्र एकच ईथे थांबा नाही…का…?प्रशासक स्तरावर वेळोवेळी विनंती मागणी केली खासदार महोदय याच्या कडे मागणी केली पण निष्फळ ठरली ती जण भावना…आदरणीय खासदार साहेबाच्या दिंडोरि लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ईन मीन तीन…स्टेशन येतात त्यात आमच नांदगाव स्टेशन..दोन वर्षे झालीत खासदार की होऊन ना नांदगाव प्रश्न बे चे पाढे पन्नास…कुठे तरी लक्षवेधी मध्ये नाम उल्लेख करायचा त्या नंतर पुढे पाठ माघ सपाट कार्यक्रम सुरू आहे आहो साहेब नांदगाव प्रश्न किती पोट तिडकीने आपण हाताळला हे आज पर्यत जनतेला दिसले नाही हाताळणी होईल का याची शाश्वती नाही…प्रश्न मार्गी लागण्याची कुठे चित्र दिसत नाही म्हणुन रेल्वे प्रश्नांसाठी एक नांदगावकर म्हणून एक व्हायला हवे आणि प्रशासनाला सामोर्य जावे असे आम्हाला वाटते. आपली प्रतिक्रिया एक नांदगावकर म्हणून आवश्यक कळवावी ही विनंती….आपली प्रतिक्रिया युवा फाऊंडेशन सामाजिक संस्था नांदगाव…..

