
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३२० वा दिवस
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पवित्र आणि नीतिमान जीवन जगल्यामुळे प्राप्त होणारे अद्भुत सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. अशी शांत वृत्ती, असे समाधान, असे प्रेम, अबोल आणि अविरत कार्यमग्नता, आणि ज्यावेळी कृती आवश्यक असेल त्यावेळी सिंहसदृश सामर्थ्यांचे प्रकटीकरण - हे सगळे तुम्हाला आणखी कोठे आढळणार आहे बरे? हे पहा, तुमचे वारसदार तुमच्या समोर उभे आहेत; भावी भारतवर्ष तुमच्यासमोर उभा आहे. काढा तुमची ती मणिरत्न भांडारे, काढा हिरे जडविलेल्या आंगठ्या. हे सारे देऊन तुम्ही जगातून नाहीसे व्हा, तुम्ही अदृश्य होता न होता तोच नव भारताच्या जागृतीची पहिली ललकारी तुम्हाला ऐकू येईल. सगळ्या जगाला दणाणून सोडीत लक्ष लक्ष कंठातून ललकारी उठेल "वाह गुरु की फतेह!" - गुरूचा जयजयकार असो!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ १२ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ३ जुलै २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ १८५० ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुखाने भारतातून आणलेला “कोहिनूर” हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
★ १९९६ हिंदी चित्रपट अभिनेते, आपल्या जबरदस्त आवाजाने संवाद साधणारे डायलॉग किंग कुलभूषण पंडित उर्फ राजकुमार यांचा स्मृतीदिन.

