
सावरगाव (प्रतिनिधी ) शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी माध्यमिक विद्यालय सावरगाव येथे दिवाळी भेट कार्ड दर्शन आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः दिपावली भेट कार्ड बनवून गावातील जेष्ठ नागरिक, आजी-माजी सैनिक, आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपावलीच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबाच्या वतीने व माध्यमिक विद्यालय सावरगाव च्या वतीने देण्यात आले. तसेच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन देखील विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्वांना करण्यात आले. सदर उपक्रमाचे शाळा समिती अध्यक्ष डॉ.शशिकांत जाधव शाळेचे मुख्याध्यापक मिलींद श्रीवास्तव यांनी कौतुक केले व दीपावलीच्या सर्व विद्यार्थी व पालक यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी भेट कार्ड बनविण्यासाठी सहकार्य केले.

