
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४१ वा दिवस

जेव्हा मी आपल्या देशाचा विचार केला, तेव्हा माझ्या अंतःकरणाला अतोनात पीळ पडला. भारतात आपण गरिबांकडे, दलितांकडे, पतितांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? वर येण्यासाठी त्यांना कोणतीही संधी मिळत नाही, कोणताही उपाय दिसत नाही. प्राप्त परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी त्यांना कुठलाही मार्ग आढळत नाही. भारतातील गरिबांना, खालच्या जातीच्या लोकांना, पतितांना कोणीही मित्र नाही, साहाय्यकर्ता नाही.... दिवसेंदिवस ते खाली खाली जात आहेत. गेल्या काही वर्षांत देशातील विचारी व्यक्तींना समाजाच्या ह्या दुरवस्थेची जाणीव झाली आहे; परंतु दुर्दैवाने त्यांनी या साऱ्या परिस्थितीसंबंधीचा दोष हिंदू धर्माच्या माथी मारला आहे. समाजाच्या उन्नतीचा एकमात्र उपाय जर कोणता असेल, तर तो म्हणजे जगातील या सर्वश्रेष्ठ धर्माचा नाश करून टाकणे हाच होय, असे त्यांना वाटते. प्रिय मित्रा, ऐक, प्रभूकृपेने मला याचे रहस्य कळले आहे. हिंदू धर्माचा यात काहीच दोष नाही. उलट, हिंदू धर्म तर तुम्हाला शिकवितो की विश्वातील सर्व प्राणी तुमच्याच आत्म्याची भिन्न भिन्न रूपे होत हे सत्य आपण प्रत्यक्ष कार्यात उतरवले नाही आपल्या ठिकाणी सहानुभूती नाही सहृदयता नाही म्हणूनच तर आपल्या समाजाची अशी हीन दशा झाली आहे समाजाची ही शोचनीय अवस्था आपण सर्वांनी एकत्रित मिळून दूर केली पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १० शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६
★ कराष्टमी
★ १८७३ बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचा स्मृतीदिन
★ १९२१ आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार शरद गणेश तळवलकर यांचा जन्मदिन
★ १९४५ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिन.
★ १९५६ भाषावार प्रांत रचना दिन.
★ १९५६ भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारी केरळ राज्यातून तामिळनाडू राज्याला हस्तांतरित करण्यात आले.
★ १९९४ शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचा स्मृतिदिन
★ जागतिक शाकाहारी दिन.

