
ओझर: दि.५ वार्ताहर
येथील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाच्या महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात
चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर, स्पर्धा शुद्धलेखन, वकृत्व, वैयक्तिक मराठी लोकनृत्य या सर्व स्पर्धा वाचनालयाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व वाचन संस्कृती वाढावी यासाठी घेतल्या जातात.

दि.०५/०७/२०२६ निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा विश्वसत्य इंग्लिश मिडीयम स्कूल, ओझर (मिग) येथे स्पर्धा वाचनालयाचे अध्यक्ष मा.श्री. वि.फ.अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाचनालयाचे सहचिटणीस श्री.बाळासाहेब ढेपले, सदस्य श्री. ज्ञानेश्वर भालेराव,सदस्य श्री. दिलीप चौधरी तसेच वाचनालयाचे कर्मचारी ग्रंथपाल सौ.गौरी कासार, सहा. ग्रंथपाल, कु गौरी गायकवाड, लिपिक सौ. माधुरी दमाले, शिपाई सौ. सुनीता आंबेकर यांच्या उपस्थितीत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर ( मिग), एच.ए.एल.हायस्कूल (इंग्लिश मिडीयम), ओझर टाऊनशिप, एच.ए.एल. हायस्कूल (मराठी मिडीयम). ओझर टाऊनशिप, गोल्डनडेज युनिव्हर्सल स्कूल, ओझर तसेच नवीन इंग्रजी शाळा,ओझर (मिग) या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. ५ वी ते १०वीचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.

