
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३२३ वा दिवस

मायेमधली प्रगती ही एक वर्तुळ पूर्ण करण्यासारखी असते. जिथून तुम्ही प्रवास सुरू करता तिथेच अखेर तुम्ही येऊन पोहोचता. फरक फक्त एवढाच की, त्या प्रवासाला सुरुवात करताना तुम्ही अज्ञानी असता, आणि तो संपवून जेव्हा तुम्ही तिथे परत येता तेव्हा तुम्ही पूर्ण ज्ञानी झालेले असता. ईश्वरोपासना, साधु-महापुरुषांची पूजा, एकाग्रता, ध्यान, निष्काम कर्म हेच मायेचे जाळे कापून बाहेर पडण्याचे उपाय होत; परंतु पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ठायी मुक्त होण्याची तीव्र इच्छा वा प्रबळ मुमुक्षा हवी. जी ज्योती लख्खन प्रकाशून आपल्या हृदयातील अंधकार उजळून टाकील, ती आपल्या आतच विद्यमान आहे. ती ज्योती म्हणजे तेच ज्ञान की जे आपला स्वभाव वा आपले स्वरूप आहे. ह्या ज्ञानाला आपले 'स्वभावसिद्ध' वा 'स्वरूपसिद्ध' ज्ञानच म्हणावे लागेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ १५ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. ६ जुलै २०२६
★ १८३७ थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्मदिन
★ १९०१ जनसंघाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्मदिन.
★ १९०५ समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्मदिन
★ युवा उद्योजक दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

