
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४२ वा दिवस

सा तु कर्मज्ञानयोगेभ्योऽप्यधिकतरा नारद भक्तिसूत्र अध्याय २ सूत्र २५ ॥
‘हे असले प्रेम कर्मापेक्षा, योगापेक्षा आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असते.’ भगवंताची प्रेमलक्षणा भक्ती ही त्या सर्व साधनांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आणि उच्च दर्जाची आहे, कारण भक्ती ही स्वतःच फलरूप आहे. कर्मानीं ते करणाऱ्याची स्वतःचीच चित्तशुद्धी साधत असते, त्यांनी दुसऱ्यांवर काही उपकार होत नाही. दुसऱ्यांचे काही भले होत नाही. आपण स्वतः साधना करून स्वतःची उन्नती करून घ्यायची असते, महापुरुष आपल्याला केवळ मार्ग दाखवून देतात, इतकेच. ‘यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी’ जसा भाव तसा लाभ. तुम्ही आपला सगळा भार भगवंतावर टाकला तर तुम्हाला सदासर्वदा त्यांचेच चिंतन करावे लागेल, आणि तशाने तुम्ही त्यांच्यासारखेच तद्रूप होऊन जाल. असल्या अखंडित चिंतनालाच म्हणतात प्रेम वा भक्ती.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ११ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २ नोव्हेंबर २०२६
★ १९३६ ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
★ १९५० नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जार्ज बर्नार्ड शॉ यांचा स्मृतीदिन
★ १९९० महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे एक प्रमुख शिल्पकार, प्लास्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक पद्मविभूषण भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा स्मृतीदिन.
★ औद्योगिक सुरक्षा दिन.

