
संमेलनाध्यक्ष नितीन वरणकार, स्वागताध्यक्ष आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर!

संत ज्ञानेश्वराय, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, चित्कला मुक्ताई यांच्या पावन जन्मभूमीत साहित्य, संस्कृती, अध्यात्म आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव यांच्या वतीने मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्रीक्षेत्र आपेगाव, ता. पैठण, जि. संभाजीनगर’ येथे सकाळी ९: ०० ते रात्री १०: ०० वाजेपर्यंत, संत ज्ञानोबाराय तृतीय साहित्य संमेलन २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लोककवी प्रशांतदादा मोरे उपस्थित राहणार असून, संमेलनाध्यक्षपदाची धुरा सुप्रसिद्ध हास्यकवी नितीन वरणकार भूषविणार आहेत. तर आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर हे स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची शोभा वाढविणार आहेत तर या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मा खासदार जयसिंगराव गायकवाड (मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार), प्रा. डाॅ. अनघा सोमवंशी (सहाय्यक विशेषाधिकारी इंग्रजी विभाग बालभारती, पुणे) गझलकार नितिन वायाळ (शिवानुज) ह.भ.प भानुदास महाराज कोल्हापूरकर, डाॅ. दुर्गासिंग जाधव, लेखक संजय गोराडे, उद्योजक सागर शिंदे, प्रा. रवींद्र मगर सर, कवी ज्ञानेश्वर शिळवणे, उद्योजक प्रकाश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील एक्कावन्न साहित्यिकांना ज्ञानरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे, ते पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे आहेत: कवयित्री मोहिनी कुलकर्णी, संभाजी नगर. कवयित्री भाग्यश्री बागड, गुजरात. कवी रावसाहेब मते, संभाजी नगर. कवयित्री शुभांगी पाटील, नाशिक. कवी अमोल चिने, नाशिक. लेखिका सुवर्णा शिनगारे, धाराशिव. कवयित्री वृषाली देवकर, परतवाडा. कवी राजेश जाधव, नाशिक. कवी काशिनाथ साळुंखे, धुळे. कवयित्री सोनल इचाळे, दाते. नाशिक. कवयित्री सुनिता सांगळे, सिन्नर. कवयित्री जयश्री वाघ, नाशिक. कवी विष्णू वाघ, सिन्नर. कवयित्री जयश्री थोरवे, भोसरी. कवी योगेश हरणे, पुणे. कवी सतीश वाडेकर, अकोला. कवी डाॅ. सतिश घाडगे, बीड. निसर्गकवी लक्ष्मण शिंदे, भोर. कवी संजय जगताप, पिंपरी चिंचवड. गझलकार गिरीश जोशी, संभाजी नगर. लेखिका वंदना कुलकर्णी, सोलापूर. कवी दताहारी कदम, नांदेड. कवी गणेश निकम, चाळीसगाव. साहित्यिक राहूल मुंढे, टिटवाळा. कवयित्री प्रभा वाघ, चाकण. कवी श्रीशैल चौगुले, सांगली. सूत्रसंचालक बाळासाहेब गिरी, नाशिक. कवी संजय धनगव्हाळ, धुळे. सूत्रसंचालक गजानन उफाडे, कात्रज. कवी गोरक्षनाथ पालवे, नाशिक. लेखक प्रशांत वाघ, येवला. प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. कवी संदीप तोडकर, रत्नागिरी. व्याख्याते सुनीलकुमार सोळंके, संभाजी नगर. चित्रकार उमेश शिंदे, डोंबिवली. कवयित्री सुनिता कपाळे, संभाजी नगर. कवयित्री माधुरी चौधरी, संभाजीनगर. सूत्रसंचालक गजेंद्रसिंह राजपूत, बुलढाणा. लेखक प्रा. रमेश गटकळ, माजलगाव. लेखक रामदीप डाके, माजलगाव. कवयित्री सुरेखा काळुसे, बुलढाणा. लेखक सचिन होळकर, लासलगाव. कवी रविकांत शार्दूल, नाशिक. कवी रंजन कापडणीस, नाशिक. लेखिका वासंती दुर्गाडे, सासवड. कवी निलेश वाणी, धुळे. वऱ्हाडी कादंबरीकार श्याम ठक, बार्शी टाकळी. गझलकार निलेश कवडे, अकोला. कवयित्री सरिता कलढोणे, जुन्नर. लेखिका, कवयित्री, प्रकाशक संजना मगर, पिंपरी-चिंचवड. संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार असून, त्यानंतर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. लोककवी प्रा. विजय पोहनेरकर हे ‘हासू आणि आसू’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार असून, या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. रवींद्र मगर करणार आहेत. हास्य, विनोद आणि भावभावनांचा अनोखा अनुभव रसिकांना या सादरीकरणातून मिळणार आहे. गझलप्रेमींसाठी विशेष गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे सूत्रसंचालन गझलकार गिरीश जोशी करणार आहेत. तसेच पुरस्कारप्राप्त कवी-कवयित्रींचे भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी आणि वृषाली बोंगाणे करणार आहेत. संमेलनाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे लोककवी प्रशांतदादा मोरे यांची प्रकट मुलाखत! त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि कलात्मक प्रवासातील विविध पैलू या मुलाखतीतून उलगडणार आहेत. ही मुलाखत कवी प्रा. संजयजी कावरे घेणार असून, त्यांच्या प्रश्नांतून प्रशांतदादांच्या जीवनप्रवासातील अनुभव, संघर्ष, साहित्यनिर्मिती आणि लोककलेतील योगदानाचा वेध घेतला जाणार आहे. यानंतर मुख्य सोहळा आणि ज्ञानरत्न पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार असून, या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्नेहल येवला करणार आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन, या साहित्य संमेलनाची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात होणार आहे. पुणे येथील ह.भ.प. सौ. पुनमताई नळकांडे-पाटील यांच्या सुमधुर आवाजात ‘अभंगवाणी’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर होणार आहे. अभंग, गौळण, भावगीते आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणातून भक्तिसंगीताचा आनंद रसिकांना अनुभवता येणार आहे. या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजन लोककवी विजय पोहनेरकर, लेखिका अलका बोर्डे, कवयित्री अश्विनी वाकणकर, उद्योजक शांताराम गायकवाड आणि लेखक संदीप राक्षे यांनी केले आहे तर या कार्यक्रमाचे नियोजन कवी संजय कावरे, कवी गणेश सांगुनवेढे, चित्रकार अरविंद शेलार, गझलकार राम गायकवाड, कवी विलास पंचभाई, कवी जे.डी भुसारे, कवी हरिदास कोष्टी, कवी रविंद्र काळे, डाॅ. राम शिंदे, कवी सुदर्शन टोपरे, कवयित्री वंदना जायले, कवयित्री स्नेहल येवला, कवयित्री अंजना भंडारी, कवयित्री पुजा बागुल, कवी पेंटर देशमुख, कवयित्री जयश्री गीते. निवेदिका वृषाली बोंगाणे, सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ, कवी संतोष साळुंके हे करणार आहेत…

