
नांदगाव (प्रतिनिधी). नाशिकमधील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुंभ नगरीत हॉटेल रॉयल हेरिटेज शालिमार येथे मारवाडी गुजराती सोशल काउन्सलिंग व दक्षिण अमेरिका पेरू आय एच सी ए सी या संस्थेच्या वतीने मानद डॉक्टरेट पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये नांदगाव येथील एडवोकेट अर्चना धवलचंद्र आढाव यांना त्यांच्या मातृभाषेतून इंग्रजी कडे या पुस्तकाच्या माध्यमातून मानद डॉक्टरेट व सामाजिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.

हे पुस्तक भारतीय व आंतरराष्ट्रीय सोळा भाषेमध्ये लिहिले असून एका तासात 2400 ओळी इंग्रजी व्याकरणासह आठ प्रकारे वाचायला, बोलायला व लिहायला शिकवते येथे डॉक्टर सच्चिदानंद शांडिल्य अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष आयएच सीएसी दिल्ली डॉ. रामकृष्णदास महाराज लवितकर श्री महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती जी महाराज त्रंबकेश्वर व पूजा माई नंदगिरी त्र्यंबकेश्वर व इतर मान्यवरांना ही पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथील मारवाडी गुजराती सामाजिक आयोग मामासाहेब व संध्या बागमार प्रायव्हेट लिमिटेड तसेच आय एच सी ए सी दिल्ली चे राज्य अध्यक्ष डॉक्टर अजित वाघमारे यांनी केले होते.

