
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३२४ वा दिवस

आध्यात्मिक जीवनाला जर सर्वात जास्त कशाचे साहाय्य होत असेल तर ते ध्यानाचे होय. ध्यानामधे आपल्या साऱ्या भौतिक उपाधी आपण टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो. ध्यान करतेवेळी आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून राहावे लागत नाही. ध्यान हीच सर्वश्रेष्ठ गोष्ट होय. मनाची ध्यानावस्था ही आध्यात्मिक जीवनाच्या सगळ्यात जवळची अवस्था होय. आपल्या दैनंदिन जीवनात ध्यानाचा क्षण हा असा एकच क्षण असतो की ज्या वेळी आपण ऐहिकतेपासून पूर्णपणे अलिप्त असतो. या क्षणी सर्व जड पदार्थांपासून अलिप्त राहून आत्मा स्वतःचेच चिंतन करीत असतो. या क्षणी आपल्याला आत्म्याचा अद्भुत संस्पर्श होत असतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ १६ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ७ जुलै २०२६
★ १८५४ कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरु केली.
★ १९१२ लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई (तापीबाई) टिळक यांचा स्मृतीदिन
★ १९६२ सुप्रसिध्द गायिका “स्वरचंद्रिका” पद्मजा फेणाणी यांचा जन्मदिन.
★ १९८१ क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्मदिन.
★ जागतिक चॉकलेट दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

