
नासिक ( प्रतिनिधी ) = साहित्य रंग साहित्य मंच आयोजित ओपन माईक सेरेमनी 2026 या कार्यक्रम मध्ये नवोदित कवी, लेखक, कलाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे गौरव उदगार सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक यांनी काढले.

आजी चे पुस्तकांचे हॉटेल मध्ये साहित्य रंग साहित्य मंच चे संस्थापक कायदे अभ्यासक सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रेरणेतुन नवोदित कलाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्रम चे भीमाआई जोंधळे, डॉक्टर प्रदिपकुमार सुरेश कळसकर, गझलकार बाळासाहेब गिरी, जालना च्या विस्तार अधिकारी शिक्षण वत्सला ताई पाटील,हे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते कवी संमेलन अध्यक्ष पदी सौं सुनंदा पाटील जेष्ठ कवियत्री व्यासपीठावर उपस्थित होत्या. लहान मोठे, बालकवी पासून वयाने जेष्ठ असलेल्या सर्वाना समान संधी व एकाच व्यासपीठावरून सादरीकरण या सुशील कुमार शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजन मुळे कार्यक्रम उत्कृष्ट झाला

सौं गायत्री गवारे व अपूर्वा कापडणीस यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालन मुळे कार्यक्रम ची रंगत वाढली व वेगळ्याच उंचीवर कार्यक्रम जाऊन पोहचला. कार्यक्रम मध्ये गायन व काव्य वाचन स्पर्धा झाली स्पर्धेचे परीक्षक सुशील कुमार शिंदे यांनी निकाल जाहिर केला काव्य वाचन स्पर्धा = प्रथम क्रमांक = प्रीती अशोक सोनवणे , द्वितीय क्रमांक = उन्नती नाकील, तृतीय क्रमांक = सम्रादणी सूर्यवंशी व उ्तेजनार्थ = कुशल दुसाने यांना जाहिर झाला गायन स्पर्धा = प्रथम क्रमांक = सौं गायत्री संदीप गवारे, द्वितीय क्रमांक = अनिता रोकडे , व तृतीय क्रमांक = सुशीला दत्तात्रय गोरडे व उ्तेजनार्थ = सुनीता झावरे यांस जाहिर झाला दिवसाची विशेष व्यक्ती = संह्याद्री संजय नाठे यांना घोषित झाला व्यासपीठावरील अतिथी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले !! अहिल्या नगर इगतपुरी खान्देश इत्यादी भागातून आलेल्या रसिक श्रोते यांनी भर पाऊसात कार्यक्रम ला हजेरी लावून कार्यक्रम उत्कृष्ट केला आहे व सर्व श्रेय सर्वांनी आयोजक सुशील कुमार शिंदे यांना देऊन अभिनंदन केलें आहे!!

