
नाशिक दिनांक ७ जुलै : नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातून पुन्हा एकदा एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. व्हि.डि.के स्पोर्ट्स फाउंडेशन स्पोर्ट्स फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रावणी सांगळे हिची चीनमधील ऑर्डोस येथे होणाऱ्या
१ ल्या आशियाई अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात अधिकृत निवड झाली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्रावणी आज चीनकडे रवाना झाली आहे.
भारतीय संघात स्थान आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) ने घोषित केलेल्या ५४ सदस्यीय भारतीय संघात धावपटू श्रावणी सांगळेने आपले स्थान निश्चित केले आहे. ही स्पर्धा चीनमधील ऑर्डोस येथे ९ ते १२ जुलै २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेत श्रावणी ४०० मीटर अडथळा शर्यत, ४०० मीटर मिक्स रिले आणि ४× ४००मिटर महिला रिले या तीन प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये चेन्नई येथे झालेल्या चौथ्या दक्षिण आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये श्रावणीने सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली होती.
श्रावणी ही गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये भारतीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या कठोर आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्सचे खडतर प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या यशात प्रशिक्षक काळे यांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य लाभले आहे.
श्रावणीच्या या आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, मित्र विहार, अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या माजी विद्यार्थी संघ आणि समस्त क्रीडा प्रेमी यांच्याकडून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
चीनच्या ट्रॅकवर ती सुवर्णा पथकासह पदकांची हायट्रिक करून भारताचा तिरंगा उंचावेल असा दृढ विश्वास तिचे प्रशिक्षक.वैजनाथ काळे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना व्यक्त केला आहे. Photo :

