
सिन्नर ( प्रतिनिधी ) सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले विद्यालयात संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री मधुकर ठमाजी (मामा )गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव श्री योगानंद मधुकर गवळी व त्याचा परिवार यांचे कडून हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री नामदेव लोणारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर यांनी केले. अध्यक्षीय मनोगतातून श्री नामदेव लोणारे यांनी श्री योगानंद गवळी आणि श्री मधुकर ठमाजी गवळी (मामा) यांनी संस्थेच्या प्रती दाखवलेले उदार दायित्व तसेच विद्यार्थ्यांप्रती असलेली आस्था याचे कौतुक केले तसेच भविष्यातही या परिवाराच्या माध्यमातून संस्थेला मदत व्हावी अशी भावना व्यक्त केली. तसेच योगानंद गवळी यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मिठे सर यांनी केले तर आभार प्रभारी पर्यवेक्षिका सविता काठे यांनी मांडले.

