
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
बाजारपेठ घोटी शहराचा दिवसेंदिवस वेगाने विस्तार होत असुन शेजारील खंबाळे घोटी पर्यंत घोटी शहराची वेगाने वाढ होते आहे.दरम्यान नाशिक, त्रंबकेश्वर आदी शहराहुन घोटीत प्रवेश करतानांच्या रस्त्यावर नेहमीच पाण्याचे तळे साचलेले असते.पावसाळयात यांस तलावाचेच स्वरुप येत असल्याने घोटीत प्रवेश करतानांच येणार्या व जाणार्यास सचैल स्नान घडते आहे.
या तळे सदृष्य रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नसुन रस्ता घोटी शहरात मात्र ग्रा.प.हद्द खंबाळे असल्याने घोटी ग्रामपालिकेस काही करता येत नाही, तर खंबाळे ग्रा.प. हद्दीत असुनही सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याचा दावा खंबाळे ग्रा. प. करत आहे तर रा.म.प्रा. रस्त्याची जबाबदारी खंबाळे ग्रा.प. वर ढकलत आहे.
ही अनारलनीय बाब असुन या ढकलाढकलीचे पाश्वर्भुमिवर नागरीक मात्र सदैव स्नान प्रवास करत आहे. ही परिस्थिती कधीतरी थांबेल का असा सवाल घोटी शहरातील युवा नेते सचिन तारगे यांनी उपस्थित केला आहे.
घोटी शहर हे महाराष्ट्रात भातासाठी व मुरमुरा साठी प्रसिद्द असुन आजु बाजुच्या तीन जिल्हयातील काही तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे.
मात्र प्रशासनामधील विविध विभागामध्ये नसलेला ताळमेळ, ढिसाळ व्यवस्थापन व गलथान कारभाराचा तीव्र फटका नागरीकानां बसत असुन याचा गंभीर परिणाम व्यापारावर ही होतो.
याकडे लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने गांभीर्याने पहावे असे आवाहन ही तारगे यांनी केले आहे.

