
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३० वा दिवस

आनुवंशिकतेच्या आधारावर ब्राह्मण जर चांडाळापेक्षा (मागासवर्गीयांपेक्षा) अधिक लवकर शिकू शकत असेल तर ब्राह्मणांच्या शिक्षणावर खर्च करण्याची जरुरी नाही, चांडाळाकरिता सर्व खर्च करा. दुर्बलांना आधी सहाय्य करा, कारण त्यांनाच साहाय्याची गरज आहे. ब्राह्मण जन्मतः हुशार असेल तर मदतीवाचूनही तो आपले शिक्षण घेऊ शकेल; दुसरे जर जात्या हुशार नसतील तर त्यांनाच शिक्षण द्या . त्यांच्याकरिताच सर्व शिक्षक नियुक्त करा. हेच मला न्यायाचे व बुद्धीला पटणारे असे तत्व वाटते. आपल्या गरीब व दलित जनतेला आपण खरोखर कोण आहोत हे कळले पाहिजे. जाती-वर्णाचा किंवा सबलते-दुर्बलतेचा विचार न करता प्रत्येक स्त्री पुरुषाला, बालक-बालिकेला सांगा व शिकवा की, सबल-दुर्बल उच्च-नीच, सर्वांच्याच अंतर्यामी तो अनंत आत्मा विराजमान आहे आणि म्हणून सर्वांच्याच ठायी थोर व सत्प्रवृत्त होण्याची अनंत शक्ती वसत आहे. प्रत्येक जीवाला आपण घोषित करून सांगा सांगू या की 'उठा जागे व्हा, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका'. हाच यशाचा मार्ग आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ २२ शके १९४८
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. १३ जुलै २०२६
★ सोमवती अमावस्या…
★ १६६० वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा बलिदान दिन (तिथीनुसार आषाढ शुद्ध पौर्णिमा ‘गुरुपौर्णिमा) त्यांनी महाराज विशाळगडावर पोहचेपर्यंत गजापूरच्या घोडखिंडीच्या (पावनखिंड) लढाईत ३०० मावळ्यांसह सिध्दीच्या १० हजार सैन्याला रोखून ठेवले होते.
★ १६६० छत्रपती शिवाजी महाराजांवर पर्यायाने हिंदवी स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी वीर शिवा काशिदचे बलिदान (स्मृतीदिन)
★ २००० साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचा स्मृतीदिन
★ २००९ सुप्रसिध्द अभिनेते निळू फुले यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

