
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३१ वा दिवस
निद्रित जीवाला हाक द्या. निद्रित जीवात्मा जागा होऊन क्रियाशील झाला म्हणजे त्याला सामर्थ्य, गौरव, सौजन्य, सुचिता व उत्तम असे सर्व काही प्राप्त होईल. गीतेत मला अधिक आवडणारा प्रभावी व सारभूत असलेला भगवान श्रीकृष्णाचा उपदेश असा...
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्।
न हिनस्त्यात्मनाऽऽत्मानं ततो याति परां गतिम् ॥१३-२८॥
सर्व भूतांमध्ये समभावे विद्यमान असलेल्या परमात्म्याला जो पाहतो, विनाशी वस्तूंत अविनाशी परमात्म्याला जो पाहतो त्यालाच खरोखर दिसत असते. कारण ईश्वराला सर्वत्र व समभावे अवस्थेत असलेला पाहून तो आत्म्याच्याद्वारे आत्म्याचा नाश करीत नाही आणि याप्रमाणे तो परमगती प्राप्त करून घेतो. वेदांताच्याद्वारे आपल्या देशात व विदेशातही लोककल्याणाची अनेक कामे करता येतील, मानव जातीच्या दुःख निवारणासाठी व उन्नतीसाठी परमात्मा सर्वव्यापी असून तो सर्वत्र समभावे विद्यमान आहे या बहुमोल सिद्धांताचा आपल्या देशात व विदेशात प्रचार व प्रसार केला पाहिजे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय आषाढ २३ शके १९४८
★ जेष्ठ अमावस्या
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. १४ जुलै २०२६
★ १८५६ दैनिक केसरी व सुधारकचे संपादक, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन.
★ १९२० महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.

