
नासिक-(प्रतिनिधी )पंचवटीतील वास्तव्य तब्बल 51 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मा. जिल्हा माहिती अधीकारी तथा जेष्ठ पत्रकार विजय पवार यांनी त्यांच्या पुस्तकं संग्रहातील 351 पुस्तकं आज पंचवटी सार्वजनिक वाचनालयास वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी दौलत यांच्या हस्ते भेट दिली.
त्यांनी दिलेल्या पुसतकात
कादंबरी, कथासंग्रह, ललित, जीवनचरित्र, विनोदी साहित्य, धार्मिक आदी पुस्तकांचा समावेश आहे.
वाचनालयचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, आमदार राहुल ढिकले, सहकार्यवाह हिरालाल परदेशी यांनी आभार मानले.

