
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५५ वा दिवस

आपल्यासमोर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, आपल्या देशाला विकसित करण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणे. देशातील लोकांचे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, आपला महान संस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपणे हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १६ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ७ ऑगस्ट २०२६
★ १९२५ भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि माजी केन्द्रीय कृषी मंत्री पद्मश्री, पद्मविभूषण व पद्मविभूषण डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिन
★ १९४१ जागतिक कीर्तीचे कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचा स्मृतिदिन.
★ गुरुदेवांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

