
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५४ वा दिवस
आजचा वाढदिवस

मनाच्या स्थिरतेवरच समस्त ज्ञान अवलंबून आहे जो या विश्वब्रम्हांडात ओतप्रोत भरून आहे, जो आत्म्याचा अंतरात्मा आहे, आत्मा माझा स्वभाव आहे. माझे स्वरूप आहे असे जाणणे म्हणजेच पूर्णज्ञान होय. आणि साक्षात्कार होय. मीच तो आहे यात लेशमात्र संशय नाही. कोणताही विचार कोणताही शब्द कोणतीही कृती मला बंधनात अडकवू शकणार नाही. मी इंद्रियातीत आहे, मी चित्स्वरूप आहे. आनंदस्वरूप आहे. अस्ति-नास्ति काहीच नाही, सर्वकाही आत्मस्वरूप आहे. समस्त सापेक्ष कल्पना झुगारून द्या. समस्त द्वंद्वभावना झुगारून द्या . समस्त अंधविश्वास झुगारून द्या; जात, कुल, देव-देवता नि इतर सारे काही नाहीसे होऊ द्या. हे विश्व हा जगत प्रपंच म्हणजे ते शुद्ध ब्रह्म होय. ब्रह्मा खेरीज आणखी काहीच नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १५ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ६ ऑगस्ट २०२६
★ १९२५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, जहाज गटाचे नेते, राष्ट्रगुरु सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृतिदिन.
★ १९४५ दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला.
★ जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक


