
साकोरा( प्रतिनिधी)पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचे माध्यमिक विद्यालय, साकोरे येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा
भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात स्कुल कमेटी चेरमन श्री. रमेश झेला बोरसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास साकोरे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, माजी विद्यार्थी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सदस्य, सखी सावित्री समिती पदाधिकारी सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संगीतमय कवायत व संचलन सादर केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांना तंबाखूमुक्त अभियानाची व काँफि मुक्तीची शपथ देण्यात आली. निरोगी व व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, नागरिक, पालक व माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. योगेश पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सुञ संचलन राजेंद्र भाबङ, क्षीरसागर सर यांनी केले.
यावेळी सर्व उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अशा प्रकारे माध्यमिक विद्यालय साकोरे येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वृंद उपस्थित होते

