
नांदगाव (प्रतिनिधी ) म.वि.प्र. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे स्वतंत्र भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्रांगणातील राष्ट्रध्वजाचे पूजन व आरोहण संस्थेचे आजीव सभासद व महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अरविंद पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु. पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरद पाटील, डॉ.सुनील पगार आदी मान्यवर उपस्थित होते. मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि.मा. अमित बोरसे पाटील यांनी शुभ संदेशातुन सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी आपल्या मनोगतातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात मान्यवरांनी हौतात्मे पत्करले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आपल्या देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी प्रत्येकाने सार्वजनिक जीवनातील कोणत्याही पदावर कार्य करताना आपल्या परीने राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे याप्रसंगी आवाहन केले व सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड,सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.एल.एम.गळदगे व आभार प्रदर्शन वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी केले.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

