
निगडोळ :(प्रतिनिधी)-येथील रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहनाचा सोहळा उत्साहात पार पडला.विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे व स्कूल कमिटीचे सदस्य मा.संजय रंगनाथ मालसाने यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन झाले.शासन परिपत्रकाप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत ८० व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने पंचक्रोशीत विद्यार्थ्यांच्या घरीही ध्वजउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.९ऑगस्ट २०२६ पासून तर १७ऑगस्ट २०२६ च्या नियोजनानुसार विद्यालयात चित्रकला,रांगोळी,क्रीडा स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,नृत्य स्पर्धा इ.स्पर्धा व सामुहिक नशामुक्त भारत शपथ,तसेच विद्यार्थ्यांची कॉपीमुक्त परीक्षा अभियान शपथ इ.कार्यक्रम राबवण्यात आले.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक श्री.कापडणीस एन.जे.यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या नियोजनानुसार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक कवायतीचे प्रकार सादर केले.तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर ड्रील मार्चिंगचे प्रदर्शन केले.
या प्रसंगी विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी,माजी विद्यार्थी व सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, नोकरी व्यवसाय व कृषी क्षेत्रातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, माजी क्रीडा शिक्षक मा.अमोल वाघमारे सर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस यांनी केले.या प्रसंगी श्रीमती पी.व्ही.गायकवाड श्री.एस.व्ही.बेद्रे,व्ही.ए.देवरे, टी.व्ही.भामरे हे उपस्थित होते.

