
सिन्नर 🙁 प्रतिनिधी )मातोश्री चांडक कन्या विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीराम क्षत्रिय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक अशोक चव्हाणके व डॉ. सुनील वाघ उपस्थित होते.
प्रतिमापूजन ॲड. श्रीराम क्षत्रिय, गोरक्ष सोनवणे, प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे, चित्रा क्षत्रिय, शिक्षक प्रतिनिधी प्रिया कुलकर्णी तसेच पालक-शिक्षक संघाचे सदस्य पोपट इलग, गुलाब कांदे, स्मिता क्षत्रिय, कोमल लहाने, रेश्मा जहागीरदार, कावेरी गुंजाळ व रोहिणी करंजकर यांच्या हस्ते झाले.

डॉ. सुनील वाघ यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगत विद्यार्थिनींनी प्रामाणिकपणा, शिस्त व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहन केले. माजी सैनिक अशोक चव्हाणके यांनी कौशल्यविकासावर भर देत स्वतःच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचा संदेश दिला. ॲड. श्रीराम क्षत्रिय यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकातून प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे यांनी आरोग्यदायी आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. प्रिया कुलकर्णी यांनी ध्वजप्रतिज्ञा दिली, तर शालेय राष्ट्रपती प्रांजल काळे हिने वर्गप्रतिनिधींना शपथ दिली.
आरोही ठोके हिने मनोगत व्यक्त केले. ज्ञानदा लहामगे हिने देशभक्तीपर गीत सादर केले, तर इयत्ता सहावी ‘अ’च्या विद्यार्थिनींनी समूहगीत सादर केले. संगीत कवायतीने उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ज्ञानयात्री’ त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. वृक्षारोपणासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
उमा लोकरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजहंस माळी, वैशाली दातीर व संध्या कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. खाऊवाटपाने सोहळ्याची सांगता झाली. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

