
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन
जव्हार या सुप्रसिध्द ऐतहासिक नगरीतुन प्रसिद्द होणार्या कालतरंग
साप्ताहिकाने मराठी साहित्य विश्वात नेत्रदिपक इतिहास रचला असुन भारतीय स्वातंत्र्य दिनाचे मुहुर्तावर या साप्ताहिकाने ४५ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे मुहुर्तावर ‘साप्ताहिक कालतरंग’चे स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे ४५ व्या वर्षात पदार्पण प्रकाशन सोहळा

मोठया थाटात पार पडला.
पालघर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितने, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर, उपजिल्हाधिकारी महेश सागर, गटविकास अधिकारी अक्षय पगारे व जव्हारचे पोलिस निरीक्षक किरण पवार यांच्या हस्ते संपन्न झाला
या प्रसंगी ॲड जितेंद्र मुकणे ॲड.पारस सहाणे व कालतरंगचे प्रतिनिधी सचिन मुकणे उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे सुपुत्र तथा वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारने नूकताच पद्मश्री पुरस्कार देऊन मा.राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.त्यांचाही यावेळी मान्यवराचें हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कालतरंगचे संपादक संदिप मुकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतानां कालतरंगच्या ४५ वर्षाच्या दिर्घ प्रवासाची चित्तरकथा उलगडुन सांगितली.

आज सोशल मिडीया च्या जमान्यात मराठी भाषेच्या कठिण कालखंडात हे सगळं महत्प्रयासाने टिकवणे ही कौतुकाची बाब आहे.समाजाने अशा व्यक्ती व संस्था यांना व्यापक पाठिंबा व सहाय करावे असे आवाहन अ.जिल्हाधिकारी कवितने यांनी केले
संपादक संदिप मुकणे यांनी आभार मानले.

