
सिन्नर :(.प्रतिनिधी ) संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अरुणा चंद्रकांत चोथवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत गोरक्ष सोनवणे, उपाध्यक्ष सौ. सोनाली ढमाले तसेच शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अरुणा चंद्रकांत चोथवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजगीत, राज्यगीत व संविधान वाचन झाले. गीतमंचाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली, तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. सोनाली ढमाले यांच्या हस्ते ‘न्यायालय’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत गोरक्ष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभारी मुख्याध्यापिका सौ. चोथवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश दिला.श्रीयुत गुंजाळ यांनी देशभक्तीपर घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन श्री. विवेक गवारी सर यांनी केले, तर गीतमंचाची तयारी श्रीमती रूपाली गवळी यांनी करून घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

