
सिन्नर ( प्रतिनिधी )जि.प. प्रा. शाळा डुबेरेवाडी येथे इ.4 थी मध्ये शिक्षण घेत असलेली कु. नुतन संतोष गोफणे या दिव्यांग विद्यार्थीनीच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण भवन येथे पंचायत समिती सिन्नरचे ध्वजारोहण करण्यात आले.
मागील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन मा. गटविकास अधिकारी श्री. भवारी साहेब यांच्या संकल्पनेने वीर पत्नीच्या हस्ते करण्यात आले होते.
सदर दिव्यांग विद्यार्थीनीचा तसेच समाजातील सर्व दिव्यांग बांधव यांचा आत्मविश्वास,समाजातील सन्मान याची वृद्धी व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविल्याचे मा. गटविकास अधिकारी भवारी साहेब यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त नायब तहसिलदार मा. दत्ता वायचळे यांची उपस्थिती लाभली.
मा. भवारी साहेब यांनी दिव्यांग विद्यार्थीनी कु. नुतन गोफणे व मा. दत्ता वायचळे यांचा पुस्तक भेट देऊन योग्य असा सन्मान केला.
80 व्या स्वांतत्र्य दिनाच्या ध्वजारोहन प्रंसगी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. विजय कुमार ढवळे साहेब यांच्यासह खाते प्रमुख गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, उपअभियंता इवद अविनाश सहाणे, महिला बालकल्याण अधिकारी गणेश सहाणे, कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे, संजकुमार गोसावी, प्रशासन अधिकारी संदिप माळी विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपास्थित होते.
सदर ध्वजारोहण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विशेष शिक्षक, कैलास आव्हाड, जि.प.शाळा सिन्नर नं 1 चे शिक्षक वृंद, केंद्रप्रमुख सिन्नर यांनी परीश्रम घेतले.

