
मोरवाडी येथील श्रीमान टी.जे. चौहान( बिटको )विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली प्राथमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष श्री. प्रसाद वाखारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरणात देश प्रेमाची भावना निर्माण केली तसेच देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच कॉपीमुक्त अभियानांतर्गत ‘गैरमार्गाशी लढा’ ही प्रतिज्ञा देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रामाणिकपणा, सदाचार आणि योग्य मार्गाने पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमास माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला बोरसे, पर्यवेक्षक श्री. दिनेश अहिरे, प्राथमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. विनायक चौधरी, तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उपस्थित होते.विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

