
पळाशी ( प्रतिनिधी ) आज दिनांक १५/०८/२०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल पळाशी तालुका नांदगाव येथील शाळेचे झेंडावंदन ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस श्री. रमेश आप्पासाहेब पगार यांच्या हस्ते करण्यात आले.तर ध्वजपूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री.अरुण पवार सांस्कृतिक प्रमुख श्री.गोकुळ शिंदे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.निंबा दादा मोरे, श्री.हिरालाल आव्हाड,श्री. साहेबराव घुगे,श्री. छोटू आबा शेवाळे,श्री. गोपीनाथ शेवाळे,श्री.माणिक चव्हाण,श्री. दत्तू भाऊ सानप, श्री.बापू सांगळे ,श्री. सुनिल राठोड इ. च्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातून मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली. तसेच देशभक्तीपर गीतांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती विद्यार्थ्यांनी सादर केल्या त्यानंतर पालकांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शैलेंद्र पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख गोकुळ शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. विशाल देवरे श्री.कैलास राठोड, श्री. विजय आव्हाड श्री अमोल देवरे, श्री.संदीप वाघ ,श्री. संदीप वाघापुरे, हर्षल पाटील, श्री.प्रभाकर घुगे,श्री. मनोज शेवाळे,श्री. अशोक शेवाळे व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

