
नांदगाव : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त दि. १५ ऑगस्ट रोजी दि. चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नांदगाव शाखेत ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सतीश बाळासाहेब शिंदे, नांदगाव शहर अध्यक्ष, भाजपा हे उपस्थित होते. तसेच बँकेचे सल्लागार मा. श्री. अशोक गुप्ता व मा. श्री. सागर गोयकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी शाखाधिकारी श्री. राजेश काळे, कर्मचारी श्री. प्रदीप उखळकर, सौ. रुपाली पांडे, श्री. विकास जठार, श्री. अनिल थोरात यांच्यासह बँकेचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह व राष्ट्रप्रेमाची भावना पाहायला मिळाली.
🇮🇳 *जय हिंद! जय भारत! 🇮🇳

