
नांदगाव ( प्रतिनिधी )मनमाड येथील साईनाथ गिडगे व्यायामशाळा येथे आयोजित शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव (कनिष्ठ विभाग) च्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या घवघवीत यशासह या खेळाडूंची आगामी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी ही स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये नांदगाव महाविद्यालयातील खेळाडूंनी विविध वजनी गटांत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हे उल्लेखनीय यश मिळवले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू:
१) साक्षी प्रमोद सोनवणे
२) सोनाली दीपक पठाडे
३) कावेरी आबासाहेब काळे
४) प्राची ज्ञानेश्वर काळे
५) दीदी आत्माराम चव्हाण
६) वैष्णवी सचिन कुलथे
७) लेखाश्री राऊत
या सर्व यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. डी. एम. राठोड, क्रीडा संचालक श्री. लोकेश गळदगे व क्रीडा विभाग सहाय्यक श्री. दिलीप अहिरराव यांचे मोलाचे तांत्रिक व कौशल्यात्मक मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल म.वि.प्र. समाजाचे नांदगाव संचालक श्री. अमितभाऊ बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, उपप्राचार्य श्री. डी. एम. राठोड, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक व हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच, पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

