
वासोळ-( प्रतिनिधी): मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन देशभक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक-पालक संघ,माता-पालक संघ आदींसह मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस. उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस.यांनी करत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा इतिहास आणि पार्श्वभूमी सांगितली. ध्वजपूजनानंतर राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मागील वर्षी ९ वीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पालक श्रीम.स्वार सरला भिमसिंग यांच्या हस्ते,तर मागील वर्षी ९ वी वर्गात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थीनी कु.वैष्णवी राजेंद्र गिरासे हिच्या हस्ते स्काऊट / गाईड ध्वजाचे ध्वजारोहण झाले.श्री.सावंत व्ही.बी.यांनी विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त शपथ दिली. त्यानंतर स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले, तसेच विद्यार्थ्यांनी स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांची वेशभूषा करुन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन श्री आहेर एस.सी.व आभार श्री सावंत व्ही. बी.यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री.निकम एस.के.श्रीम. गुजर एस.एन.श्री.पवार आर.एस.श्री.चौधरी आर.एस.श्री ठाकरे एस.डी.श्रीम. मोरे जे.आर. व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संस्मरणीय केला.*वासोळ-इंदिरा माध्यमिक विद्यालय वासोळ येथील विद्यालयात ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून सलामी देतांना उपस्थित मान्यवर….*

