
लासलगाव, (.प्रतिनिधी) दि. १५ : नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन श्री. प्रकाश जगताप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एनसीसी छात्रांनी ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना तिरंगा ध्वजाचा योग्य सन्मान राखण्याचे आवाहन केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत मोठा लढा दिला. त्यांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ प्रतिबंधक शपथ तसेच कॉपीमुक्त अभियानाची शपथ दिली.
कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर, संचालक श्री. चंद्रशेखर भावसार, श्री. हसमुखभाई पटेल, श्री. अनिलशेट डागा, डॉ. भाऊसाहेब रायते, श्री. संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या शितल आचार्य, उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट बापू शेळके यांनी केले.

