
मालेगाव ( प्रतिनिधी ) स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी रात्री १० ते १२ दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे स्वागत व क्रानतीगीतांव्दारे स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्र सेवा दल मैदान, रेवा बाग, पंचायत समिती जवळ, मालेगाव कॅम्प येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. आदिनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ गौरव कापडिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सेवा दल सैनिक सुनील वडगे यांनी बहारदार देशभक्तीपर गिते सादर केली. राष्ट्र सेवा दल जिल्हा प्रतिनिधी विष्णू गुमाडे यांची शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती झाले बद्दल व नचिकेत कोळपकर यांचे सेवा दलातील बहुमूल्य योगदाना बद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दलातर्फे सत्कार करण्यात आला. ‘पणती’ या उपक्रमामार्फत नचिकेत कोळपकर यांनी महात्मा गांधीजींचा मानवतावाद हे पुस्तक १० कार्यकर्त्यांना भेट दिले. रात्री १२.०२ वा. प्रमुख अतिथी डॉ. कापडिया याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मानवंदना देण्यात आली .
यावेळी डॉ. कापडिया आणि जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पठाडे यांनी शुभेच्छा संदेश दिला. रिजवान बॅटरीवाला यांनी नशामुक्तीचा संकल्प दिला. तसेच सर्वांनी मिळून स्वातंत्र्य दिन संकल्प घेतला.
रविराज सोनार यांनी सूत्रसंचालन केले. मोरेश्वर जोशी यांनी आभार मानले.
यावेळी सेवा दल राज्य मंडळ सदस्य राजीव वडगे, तालुका संघटक बळवंत अहिरे, महिला विभाग प्रमुख गीता जोशी, अॅड. भास्कर तिवारी, सारंग पाठक, दीप पाठक, ऋतुजा पाठक, प्रभास जोशी, आंनदी जोशी, कपिल कनोज, नरेश जगताप, सुनील देवरे, राजेंद्र रासने, डॉ. सत्यजित शाह, डॉ. संदिप खैरनार, रमेश उचित, जितेंद्र चव्हाण, अजिंक्य कन्नल, यांसह राष्ट्र सेवा दल आणि समविचारी संस्था संघटना कार्यकर्ते उपस्थित होते.

