
नांदगाव -(वार्ताहर)-आश्रम शाळा, सारताळे ता. नांदगाव येथे आज संस्था अध्यक्ष दर्शन दादा पगार, कोषाध्यक्षा सौ. नम्रता पगार मॅडम, नांदगाव शिक्षण शास्त्र महाविद्यालय प्राचार्य विक्रम घुगे सर , संत गजानन महाराज महाविद्यालय प्राचार्य सुरसे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांच्या अध्यक्षतेत भारताचा 80 वा स्वतंत्र दिवस उत्सहात साजरा झाला.संस्था अध्यक्ष श्री दर्शनदादा पगार यांच्या हस्ते ध्व्जारोहन करण्यात आले. वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्व्जगीता नंतर आश्रम शाळेच्या मुलांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत सादर केली. नंतर आश्रम शाळेच्या मुलींची भाषणे झाली. सदर प्रसंगी विक्रम घुगे व प्राचार्य समाधान चौधरी यांनी स्वातंत्र्य दिनाचा हेतु सांगत समर्थ राष्ट्राची उभारणी ही आजच्या कर्तृत्वान तरुण पिढीच्या हातात असल्याची जाणीव करून देत तरुणांनी शिक्षणाची व व्यवसायाची कास धरावी असे आव्हान केले.’तंबाखु मुक्त शाळा’ व ‘कॉपी मुक्त परीक्षा’शपथ देण्यात आली.कार्यक्रम प्रास्ताविक अरविंद कोळी यांनी मांडले तर सुत्रसंचालन दिपक सुर्यवंशी यांनी सांभाळले, कवायत संचालण भगवान हिरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक, अधीक्षक, अधिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेत.कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

