
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासअण्णा कांदे यांचा ‘नवभारत’तर्फे विशेष सत्कार आज नांदगाव येथे करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना आकर्षक सन्मानचिन्हाची फ्रेम प्रदान करण्यात आली.
यावेळी ‘नवभारत’चे जनरल मॅनेजर प्रशांत वाघ, ब्युरो चीफ गौतम संचेती आणि विशेष प्रतिनिधी बब्बू शेख उपस्थित होते.
आ. कांदे यांनी आपल्या कार्यकौशल्याने, कर्तृत्वाने आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांतून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘नवभारत’तर्फे हा विशेष सन्मान करण्यात आला.
‘नवभारत’ हे हिंदी भाषेतील अग्रगण्य दैनिक असून, त्याची स्थापना १९३४ मध्ये झाली. आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विविध आवृत्त्यांद्वारे ते प्रकाशित होत असून, विश्वासार्ह पत्रकारिता, सखोल वृत्तांकन आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी ‘नवभारत’ची ओळख आहे.
याच समूहाचे मराठी दैनिक ‘नवराष्ट्र’ २००० पासून प्रकाशित होत असून, नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह महाराष्ट्रातील विविध भागांतील वाचकांपर्यंत ते पोहोचत आहे.

