
मोहाडी:- (बातमीदार) स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम मविप्र संचलित के आर टी हायस्कूल व ज्यु कॉलेजमध्ये संपन्न झाला . प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य शिवाजी शिंदे यांनी केले. मविप्र समाज संस्थेचे ज्येष्ठ सभासद मुकुंद बापू पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीतशिक्षक दिलीप पागेरे व गीतमंच यांनी वंदे मातरम,राष्ट्रगीत सादर केले . स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण अभिनव बाल विकास मंदिर शालेय समिती अध्यक्ष रामराव पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. क्रीडाशिक्षक सोनाली देशमुख व विजय पवळे यांच्या मार्गदर्शनाने या सांघिक कवायत व स्काऊट गाईड संचलन झाले तर स्काऊट गाईड पथकाला हेमराज गांगोडे व राम ढगे यांनी मार्गदर्शन केले.शालेय ढोलपथकाने ढोल -वाद्य सादरीकरण केले. शालेय पंतप्रधान कु कार्तिकी गायकवाड हिने दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त अभियानांतर्गत शपथ दिली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून तंबाखूमुक्त व जंकफूड मुक्त शाळा शपथ हरि कोर व तुषार गिते यांनी घेऊन जनजागृती रॅलीचे आयोजन गावात करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाचा शुभसंदेश देताना देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने प्रथम देशाला प्राधान्य द्यावेत सुरवात नक्कीच आपल्यापासून करावी असे आवाहन केले. विशेष वृक्ष लागवड अंतर्गत मान्यवरांनी वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सुरेश सोमवंशी शालेय व्यवस्थापन समिती दिपक देशमुख, माता पालक संघ उपाध्यक्षा शितल जाधव, सरपंच भाग्यश्रीताई जाधव, उत्तम काका जाधव निखिल भाऊ जाधव, सेवानिवृत्त सैनिक राजाराम देशमुख, शांताराम जाधव, वसंत देशमुख, चंद्रभान कळमकर, हिरामण पिंगळ, सर्जेराव देशमुख (आबा), शिवाजीराव जाधव, वैभव भार्गवे तसेच एस एस जाधव .दिपक जाधव, प्रदिप जाधव , दत्तात्रय मौले, एल टी पाटील गुरुजी, सोमनाथ जाधव, डॉ चंद्रकांत पाटील, दिपक वारुंगसे, स्वप्निल जाधव,बाकेराव मौले. प्रदिप बबनराव जाधव. चंद्रशेखर जाधव, भिमराव जाधव, दत्तात्रय थोरात, केशव काका जाधव, पर्यवेक्षक संजीव पठाडे,, आय टी आय प्राचार्या वारुंगसे मॅडम, अभिनव मुख्याध्यापिका सोनाली देशमुख व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर भवर व गोविंद बैरागी यांनी केले. सुंदर असे फलक लेखन कलाशिक्षक धनंजय जाधव व चित्रलेखा नाठे यांनी केले. सांस्कृतिक समिती प्रमुख कांचनमाला हुजरे नियोजन होते , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली.

